पैसा करा ‘मॅनेज’

Swapna Mirashi

तुमची जीवनशैली कशी आहे? तसे जगण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागतो? विचार करा, दरमहा तुमच्या हातात जेवढा पैसा येतो, त्यातून तुम्ही सध्या जी जीवनशैली जगता आहात, ती आयुष्यभर जगू शकाल याची खात्री मिळते का? याचे उत्तर येते ‘नाही.’ मग काय करावे लागेल? तुम्हाला तुमच्या गरजा आयुष्यभर भागवता येतील, एवढा पैसा कसा पुरवायचा?

विचार करून टेन्शन आले का? मुळीच काळजी करू नका. कारण त्यासाठी मस्त आयडिया आहे.. तुमचे जगणे सुसह्य करू शकणारी ही गुरुकिल्ली म्हणजे पैशांचे हुशारीने व्यवस्थापन ! पैशांच्या योग्य नियोजन, व्यवस्थापनामुळे तुम्ही तुमचे पैसे कल्पनाही करू शकणार नाही एवढे पुरवू शकता!

मला सांगा, पैसा नेमका कशासाठी असतो? केवळ खर्च करण्यासाठी की बचतीसाठी? यापलीकडे जाऊन उत्तम व्यवस्थापनातून पैशांचा स्मार्ट ‘वापर’ केला तर? येस्स! आर्थिक नियोजन आपल्याला हेच सांगत असते. आपले मोठे खर्च किंवा पैशांच्या घराबाहेर जाण्याच्या महत्त्वाच्या वाटा ओळखल्या आणि त्या प्रत्येक बाबीसाठी उत्पन्नाचा एक भाग राखून ठेवल्यास हे सहजरीत्या जमू शकते.

सोप्या भाषेत सांगू? भविष्याचा विचार करून पैशांचे व्यवस्थित नियोजन करणे म्हणजे आर्थिक व्यवस्थापन.. हे नियोजन नेमके कसे करायचे, त्याचे महत्त्वाचे टप्पे कोणते, हे आज आपण अगदी झटपट म्हणजे एका कटाक्षात पाहणार आहोत..

पैशांचे व्यवस्थापन कशासाठी करायचे?

’ अचानक घडणार्‍या घटना आणि खर्चाच्या तयारीसाठी.

’ तुमच्यावरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी.

’ तुम्ही आयुष्यात ठरवलेली ध्येये, उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी.

मूलभूत आर्थिक व्यवस्थापनाचे चार खांब

१) उत्तम रीतीने बचत

२) हुशारीने खर्च

३) आर्थिक स्थिरता

४) आपलं ‘बजेट’

पैसा ‘मॅनेज’ करण्याचे सहा मंत्र

उत्तम रीतीने बचत

१) आतापासूनच सुरुवात करा. बचतीला प्राधान्य द्या. नियमित बचत करा.

हुशारीने खर्च

२) आधी तुमच्या आवश्यक गरजांवर पैसे खर्च करा. त्यानंतर तुमच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खर्च करा आणि पैसे मुळीच वाया जाऊ देऊ नका !

आर्थिक स्थिरता

३) बचत खाते आणि काढलेला विमा हे तुमच्या आर्थिक गाडीचे ‘शॉक अँब्सॉर्बर्स’ समजा. त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

४) कर्जांचा वापर तुमच्या जीवनाला स्थिरता आणण्यासाठी करा, आयुष्यावर नियंत्रणे वा बंधने आणण्यासाठी नको!

५) पैसे देण्याच्या तारखा कधीही चुकवू नका. पैसे वेळेवर भरा.

आपलं ‘बजेट’

६) आपलं उत्पन्न आणि खर्च किती आहे त्यानुसार आपलं स्वत:चं ‘बजेट’ तयार करा. आपल्याकडे येणारा पैसा आणि जाणारा पैसा यांचं योग्य संतुलन राखा. हे संतुलन बिघडणार नाही याची काळजी घ्या आणि त्यात सातत्य राखा.

पैसा कुठून येतो?

१) वेतन

२) भत्ते

३) नफा

४) आपल्या कामाची फी.

या सार्‍या पैशांचं योग्य व्यवस्थापन करा.

पैशांची वर्गवारी कशी कराल?

१) आर्थिक स्थिरतेसाठी

’ आपत्कालीन निधी

’ विमा

२) बचत

’ बचत खात्याला आतापासून सुरुवात

’ बचतीला प्राधान्य

’ नियमित बचत!

३) खर्च

’ गरजांवर आधी

’ इच्छांवर नंतर

’ पैसे वाया जाऊ देऊ नका

४) गुंतवणूक

स्मार्ट गुंतवणूक करा आणि मुख्य म्हणजे आपल्या प्रत्येक व्यवहाराची हिशेबाची व्यवस्थित नोंद ठेवा.

Comments