‘रेकॉर्ड किपिंग’चे चार टप्पे

Swapna Mirashi

1) महत्त्वाची कागदपत्रं ओळखा

तुम्ही वेळोवेळी जमा केलेली महत्त्वाची कागदपत्रं शोधून काढा. त्यांचं योग्य वर्गीकरण करा. लक्षात घ्या, प्रत्येक कागद वर्षानुवर्षे जपून ठेवण्याची गरज नसते. त्यानुसार मुदतीतली कागदपत्रं ओळखून ती बाजूला काढा.

 

2) सुरक्षित ठिकाणी ठेवा

ही सगळी महत्त्वाची कागदपत्रं गरज लागेल तेव्हा चटकन सापडतील, अशा रीतीनं ठेवा. त्यासाठी फाइल्स, सुरक्षित खोकी किंवा ब्रीफकेससारख्या साधनांचा वापर करू शकता. याशिवाय चटकन लागणा:या संदर्भासाठी तुमचे खर्च, गुंतवणूक आणि इतर नोंदींचा सुलभ गोषवारा एखाद्या स्वतंत्र कागदावर किंवा कॉम्प्युटरमध्येही नोंदवून ठेवू शकता.

 

3) कागदपत्रं अद्ययावत करा

आता ही कागदपत्रं नेहमी अद्ययावत करीत राहा. त्यांना नवे संदर्भ जोडत राहा. मुदतबाह्य झालेले कागद फेकून देत राहा. उदा : एखाद्या वस्तूचे वॉरंटी कार्ड एका वर्षापुरतेच मर्यादित असेल, तर ते वर्षानुवर्षे सांभाळून ठेवण्यात काहीच अर्थ नाही.

 

4) देण्यांचं कॅलेंडर तयार ठेवा.

तुम्हाला ज्या रकमा द्यायच्या आहेत, त्यांचे छोटंसं कॅलेंडर तयार करा. उदा : क्रेडिट कार्डची बिलं, विम्याचे हफ्ते, मुदत ठेवी, कर्जाचे हफ्ते वगैरे. यामुळे तारीख चुकून होणारं नुकसान टळू शकतं.

Comments