सापशिडीच्या खेळात काय होतं? शिडी हाताशी आली की आपण झप्पकन वर जातो आणि सापानं गिळलं की दाणकन खाली आदळतो ! रोजच्या जमाखर्चाच्या सारिपटात हाच नियम लक्षात ठेवायचा. ‘शिडय़ा’ वाढवायच्या आणि ‘साप’ काढून टाकायचे! बस्स!
—————-
लहानपणी तुम्ही सापशिडीचा खेळ खेळलाय का? त्या पटावरच्या शिडय़ा तुम्हाला झटकन वरच्या आकडय़ार्पयत म्हणजे प्रगतीकडे पोहोचवतात आणि साप मात्र दणदिशी खाली आणून सोडतात.. पर्यायाने तुमचे नुकसान करतात ! तुमच्या वैयक्तिक, आर्थिक व्यवस्थेकडेही तुम्ही सापशिडीचा खेळ म्हणून पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की, आर्थिक पटावरील साप आणि शिडय़ांची संख्या तुमच्या गरजा, सवयी आणि कामावर अवलंबून असते ! त्यातल्या सापांची संख्या कमी केल्यास आणि शिडय़ा वाढवल्यास तुम्ही तुमचे उद्दिष्ट कार्यक्षमतेने गाठू शकाल..
पण हे करणार कसे?
चिंता नको ! तुमच्या आर्थिक पटावरील साप घटवण्यासाठी आणि शिडय़ा वाढवण्यासाठी हे काही सोपे मार्ग.. त्यांचा अवलंब केल्यास विजय निश्चित!
पैसे ‘यायला’ हवेत
आपल्याकडे पैसे कसे येतील आणि कसे टिकून राहतील याकडे सदैव आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यासाठी काय कराल?
> तुमच्याकडे स्थिर आणि नियमित उत्पन्नाचे स्नेत असावेत. एकाहून अधिक उत्पन्नाचे स्नेत असतील, तर आणखी उत्तम.
> त्यासाठी कुटुंबातल्या कमावणा:या व्यक्तींची संख्या अधिक असावी.
> तुमच्या मूळ नोकरी, व्यवसायाशिवाय एखादा ‘साइड बिझनेस’ असावा.
> दरमहा उत्पन्न मिळवू शकाल, अशा बाबींत तुमची गुंतवणूक असावी.
उदा : म्युच्युअल फंड्स, पोस्ट ऑफिसातील बचत खाते वगैरे.
पैशाला ‘शिस्त’ हवी
आपल्याकडून जाणा:या पैशाला ‘ब्रेक’ कसा लागेल याकडे डोळ्यांत तेल घालून पाहायला हवं. कसा लावाल हा ब्रेक?
> चांगल्या आर्थिक व्यवस्थापन सवयी अंगी बाणवाव्यात.
> आपले आर्थिक अंदाजपत्रक तयार असावे. म्हणजे भविष्यातल्या उत्पन्न आणि खर्चाची जाण असावी.
> पैशांचा खर्च विचारपूर्वक करावा.
> चांगली बचत होईल, याकडे लक्ष द्यावे.
आत्ताच करा.
> आपल्या उत्पन्न आणि खर्चाची नोंद आपण करतो का? नसेल तर आज, आत्तापासूनच व्यवस्थित नोंदीची सवय लावा. संपूर्ण कुटुंबाची देणी, मालमत्ता, बचत आणि भविष्यातील गरजांकडे बारकाईने लक्ष द्या.
> बचत खाते, विमा, गुंतवणूक योजना यांसारख्या प्राथमिक आर्थिक गोष्टी वा सेवांबाबत कायम नवी माहिती मिळवत राहा.
> बॅँक वा पोस्ट ऑफिसात स्वत:चे बचत खाते उघडा आणि मुख्य म्हणजे त्याचा नियमित वापर करा.
> कुटुंबासाठी आपत्कालीन वेळी लागू शकणा:या निधीची व्यवस्था आपल्या बचत खात्यातूनच करून ठेवा. म्हणजे आणीबाणीच्या वेळी तुम्हाला कोणाकडे पैसे मागण्याची वा कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.
> पैशांच्या योग्य गुंतवणुकीबाबत आग्रही राहा.
’ जागा, सोने वा अन्य मौल्यवान वस्तूंची खरेदी करा.
’ व्यवसाय वा एखाद्या व्यावसायिक संस्थेत पैसे गुंतवा.
’ बॅँकेतील मुदत वा आवर्ती ठेवी, म्युच्युअल फंड्स, शेअर्स (अर्थात, योग्य ती माहिती घेतल्यानंतरच) या बाबींमध्ये पैशांची गुंतवणूक करा.
> कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीचा जीवन विमा काढून घ्या.
> विवाह, प्रसूती, शिक्षण, पर्यटन, पै-पाहुणो, नुकसान, तोटा या कारणांसाठी अगोदरच काही पैसे बाजूला काढून ठेवा.
> आरोग्य विम्याचाही विचार करायला हरकत नाही. घरात कोणाचे आजारपण असेल किंवा तुमच्या एकूण उत्पन्नाचा बराचसा भाग डॉक्टरांची बिले भरण्यात कायम खर्च होत असेल, तर आरोग्य विमा काढून घ्या.
> तुमच्या क्रेडिट कार्डची बिले, विम्याचे हफ्ते, कर्जाचे हफ्ते, बचत खात्याचे डिपॉङिाट वेळेवर भरा.
> फारच गरज असेल तरच अगदी काळजीपूर्वक नियोजन करूनच कर्ज घेण्याचा खटाटोप करा. तेसुद्धा परतफेडीचे पूर्ण नियोजन करून आणि कर्जाच्या अटी व्यवस्थित समजावून घेऊनच.
> तुमच्या उत्पन्नातून चांगली बचत होत असेल आणि भविष्यातही स्थिर उत्पन्न मिळत राहण्याची खात्री असेल, तेव्हाच व्यावसायिक, गृह वा वाहन कर्ज घ्या.
> ग्राहक म्हणून उद्भवणारे धोके टाळण्यासाठी, एखाद्या आर्थिक घोटाळ्यात फसवणूक होऊ नये, यासाठी तुमचे आर्थिक हक्क आणि जबाबदा:यांबाबत जागरूक राहा.